ब्रेकिंग न्यूज...एसबीआय बँकेचे एटीएम फोडून ७ लाख लंपास

Admin
एसबीआय बँकेचे एटीएम फोडून ७ लाख लंपास
तपासासाठी पोलिसांची पथके रवाना


इचलकरंजी : हॅलो प्रभात
येथील सांगली मार्गावरील यड्राव फाट्याजवळील एसबीआय बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरने फोडून सुमारे 7 लाख रुपये लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. चारचाकी वाहनात्ूान आलेल्या 3-4 जणांनी अवघ्या 10 मिनिटात हे सर्व केल्याचे सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होत्ो. विशेष म्हणजे याच टोळीने यड्रावनंतर सांगली-तासगाव मार्गावरील बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन गॅस कटरने फोडुन सुमारे 16 लाख रुपये लंपास केल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आत्तापर्यंत घरफोडी, चोरीच्या घटना होत होत्या मात्र एकाच रात्री यड्राव आणि बुधगाव या ठिकाणच्या बँकेचे एटीएम मशिन फोडून रोकड लंपास करत आंतरराज्य टोळीने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.


वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसायामुळे इचलकरंजीची झपाट्याने हद्दवाढ होत आहे. चोरी, घरफोडीच्या घटना आणि वर्चस्ववादात्ूान कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर ताण येत होता. त्यामुळे स्वतंत्र शहापुर पोलीस ठाणे सुुरु झाले. मात्र गुन्हेगारीचा आलेख काही थांबता थांबेना. अशातच आता शहापुर पोलीस ठाणे हद्दीतील इचलकरंजी-सांगली मार्गावरील यड्राव फाट्याजवळ एसबीआय बँकेचे एटीएम मशिन फोडल्याचा प्रकार आज सकाळी 7 वाजता उघडकीस आलाय.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांच्यासह गावभाग, शिवाजीनगर, शहापूर आणि स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्राजवळ मंगळवारी रात्री 2 वाजुन 50 मिनिटांनी चारचाकी वाहन आले. या चारचाकी वाहनात्ुान तोंडाला कापड बांधलेला एकटा उतरला आणि एटीएम परिसराची पाहणी केली. परिसरात कोणीही नसल्याची खात्री करुन घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून 2 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारला आणि चारचाकी वाहन एटीएम केंद्राजवळ घेतले. गाडीत्ूान 3-4 जणांनी गॅस कटरसह अन्य साहित्य काढले आणि एटीएम केंद्राचे शटर बंद करुन कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. एटीएम फोडण्यासाठी वापरलेले सर्व साहित्य गाडीत ठेवून 3 वाजता या टोळीने पलायन केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शासकीय बँकेचे एटीएम मशिन असले तरी त्या ठिकाणी सुरक्षारक्षक अथवा मशिन सुरक्षित्ोबाबतचा सायरन नसल्याचेही प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले.

सांगली-तासगाव मार्गावरील बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन गॅस कटरने फोडुन सुमारे 16 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. एकाच रात्री यड्राव आणि बुधगाव या ठिकाणच्या बँकेचे एटीएम मशिन फोडून रोकड लंपास करत आंतरराज्य टोळीने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.



सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिकाऱ्यांनी तपासाबाबत सुचना केल्या. ठसेतज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होत्ो. मात्र घटनेनंतर टोळीने वाहनात्ूान पलायन केल्याने श्वान परिसरातच घुटमळले. या घटनेत सुमारे 7 लाखाची रोकड घेऊन टोळीने पलायन केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान गुन्ह्याची पद्धत पाहता एटीएमबाबत माहिती असलेल्या माहितगार आंतरराज्य टोळीने एटीएम फोडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने तपासासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत. विशेष म्हणजे शासकीय बँकेचे एटीएम फोडून टोळीने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
Tags
To Top