![]() |
झटपट श्रीमंतीच्या नादात ५ अब्ज जण बेटिंगच्या जाळ्यात |
मुंबई : हॅलो प्रभात
अवैध सट्टेबाजी प्लॅटफॉर्मवरील मोठ्या रकमेच्या आमिषांमुळे अल्पवयीन तरुण-तरुणी तसेच दुर्बल घटकांमधील नागरिक लुबाडणीच्या जाळ्यात खेचले जात आहेत. कट्स इंटरनॅशनलने जारी केलेल्या 'फिक्सिंग द ऑड्स: अ पॉलिसी ब्लूप्रिंट फॉर करबिंग इलिगल ऑनलाईन गॅम्बलिंग इन इंडिया' या अहवालानुसार अवैध जुगार चालवणारे नियमांतील पळवाटांचा गैरफायदा घेत लुबाडणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
एका वर्षात १५ अवैध जुगार प्लॅटफॉर्म आणि त्यांच्याप्रमाणे असणा-या इतर साईट्सवर ५.४ अब्जांहून अधिकजण लॉग-इन झाले आहेत. यावरून झटपट पैशांच्या आमिषाला आहारी जाणा-यांचे प्रमाण किती गंभीर आहे हे दिसून येते. नियमांचे बंधन नसल्याने या प्लॅटफॉर्मवर तरुणांना कल्पनेच्या पलीकडील आश्वासने, ऑफर्स दिल्या जातात.
![]() |
Join Our WhatsApp Group |
कट्सचे संस्थापक आणि सरचिटणीस प्रदीप मेहता यांनी अहवालाबद्दल सांगितले की, बेकायदेशीर जुगार चालक भारताच्या जाहिरात आणि पेमेंट पायाभूत सुविधांचा पद्धतशीरपणे फायदा घेत आहेत आणि कोट्यवधी रुपये देशाबाहेर पाठवत आहेत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे आणि भारतीय ग्राहकांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
धोरणात्मक पातळीच्या अभावावरील या अहवालाच्या विश्लेषणातून हे अस्वस्थ करणारे तथ्य समोर आले आहे की एकीकडे अनेक देश बेकायदेशीर जुगाराविरुद्ध कठोर पावले उचलत आहेत आणि या दिशेने मोठ्या टेक प्लॅटफॉर्मशी भागीदारी करत आहेत, तर दुसरीकडे भारतात ते रोखण्यासाठी एक सामान्य व्यवस्था देखील नाही. त्वरित नियामक कारवाई न केल्यास, हे प्लॅटफॉर्म असुरक्षित वापरकर्त्यांना लक्ष्य करत राहतील. भारतीय वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचे आणि आपल्या डिजिटल परिसंस्थेच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्याला त्वरित कारवाई करणे आवश्यक असल्याचे ही प्रदीप मेहता यांनी सांगितले.