नीट परीक्षा पुढे ढकलली ; परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार

Admin
नीट परीक्षा पुढे ढकलली ; परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार

नवी दिल्ली : हॅलो प्रभात
येत्या १५ जून रोजी होणारी नीट पीजी २०२५ परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने  पुढे ढकलली.  सर्वोच्च न्यायालयाने नीटची परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या, असे निर्देश  एनबीईएमएस दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. एनबीईएमएसचे अधिकृत अधिकृत पोर्टल वगळता इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असेही विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.


NOTICE, NATIONAL BOARD OF EXAMINATIONS
IN MEDICALSCIENCES NEW DELHI

नवी तारीख जाहीर झाल्यानंतर परीक्षेच्या चार दिवस आधी अॅडमिट कार्ड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून उमेदवारांना ते डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्डशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
 
Join Our WhatsApp Group 
To Top