सांगलीत पूर्ववैमनस्यातून भाजी विक्रेत्याचा खून |
सांगली शहर पुन्हा एका खुनाच्या घटेनेने हादरले असून गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील एका भाजी विक्रेत्याचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला. सदरची घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
याबाबर अधिक माहिती अशी, महेश प्रकाश कांबळे (रा. इंदिरानगर ) असे खून झालेल्याचे नाव असून त्याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी तो भाजी विक्रीसाठी नेहमीप्रमाणे शंभर फुटी रस्त्यावर आला होते. त्यावेळी दोन संशयित तेथे आले. त्यांनी कांबळे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यानंतर स्थानिकांचा एकच गोंधळ उडाला. कोयत्याचे वार खोलवर असल्याने कांबळे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
![]() |
Join Our WhatsApp Group |
दरम्यान, मृत महेश याने नोव्हेंबर 2021 मध्ये फिरोज उर्फ बडे शेख (वय 45, रा. जुना कुपवाड रोड) याचा खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सदरची घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून शहर पोलीस आणि एलसीबीची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.