शिवराज्याभिषेक दिननिमित्त नृत्याविष्कार, लेझर शोचे आयोजित

Admin
शिवराज्याभिषेक दिननिमित्त  नृत्याविष्कार
लेझर शोचे आयोजित
 


सांगली : हॅलो प्रभात
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने उद्या (ता. ६) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे येथे शिवगौरव गीतांवर नृत्याविष्काकार, नयनरम्य लेझर शो, आतषबाजी केली जाणार आहे. विरेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अखंड शिवज्योतीचा चौथा वर्धापनदिन सोहळादेखील यावेळी साजरा केला जाणार आहे. फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी ही माहिती दिली.


शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्यानिमित्ताने होणारा सांस्कृतिक कार्यक्रम हे समीकरण बनले आहे. पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे दरवर्षी येथे भव्य सोहळा आयोजित केले जातो. देशातील पहिल्या अखंड शिवज्योतीचे अनावरण याच दिवशी चार वर्षांपूर्वी करण्यात आले होते. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त विरेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून ही शिवज्योत साकारण्यात आली. ती अखंडपणे तेवते आहे.

Join Our WhatsApp Group 

यंदा सुमित डान्स ॲकॅडमीचा शिवगौरव गीतांवरील नृत्याविष्काराचे खास आकर्षण असणार आहे. त्यासोबतच विद्युत रोषणाई, आतिषबाजी, विद्युत शो आयोजित करण्यात आला आहे. सर्व शिवप्रेमी आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे.
To Top