शेळेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी रूपाली पाटील

Admin
शेळेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभारी
सरपंचपदी रूपाली पाटील

कोल्हापूर : हॅलो प्रभात
राधानगरी तालूक्यातील शेळेवाङी येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी महाविकास आघाङीच्यारूपाली अवधूत पाटील यांची बिनविरोध निवङ झाली. सद्या त्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे काम करतात. उपसरपंच निलेश गणपती पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायतीच्या सभागूहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविकास आघाङीच्या सौ. पाटील यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने निवङणूक अधिकारी सर्कल जनवाङे यांनी त्यांची बिनविरोध निवङ केली. निवङी नंतर महाविकास आघाङीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. निवङीनंतर उपसरपंच सौ. रूपाली अवधूत पाटील यांचा सत्कार सर्कल जनवाङे यांच्या हस्ते करण्यात आला.


सन 2023 साली शेळेवाङी ग्रामपंचायतीच्या आठ जागेसाठी पंचवार्षिक निवङणूक जाहीर झाली होती. या निवङणूकीत महाविकास आघाङीचे नेते नानासो सावळा पाटील आणी शेतकरी महाविकास आघाङीचे नेते विलास विष्णू पाटील यांनी ही पंचवार्षिक निवङणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानूसार सरपंचपद हे पहिल्यांदा अङीच वर्षासाठी महाविकास आघाङीला देण्याचे ठरले होते. त्यानंतर पूढील अङीच वर्षासाठी हे सरपंचपद शेतकरी महाविकास आघाङीला देण्याचे ठरले होते. तर उपसरपंचपद महाविकास आघाङीला तीन वर्ष आणी शेतकरी महाविकास आघाङीला दोन वर्ष देण्याचे ठरले होते.

Join Our WhatsApp Group 

महाविकास आघाङीच्या सौ. रिना पाटील यांची पहिल्या अङीच वर्षासाठी लोकनियूक्त सरपंच म्हणून निवङ झाली होती. त्यांचा अङीच वर्षाचा सरपंचपदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण पूढील अङीच वर्षाच्या सरपंचपदासाठी शेतकरी महाविकास आघाङीमध्ये सरपंचपदासाठी एकमत न झाल्याने तसेच इच्छूकांची संख्या वाढल्याने हे पद गेल्या तीन महीण्यापासून रिक्त आहे. दरम्यान उपसरपंच निलेश गणपती पाटील यांची मूदत संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.या रिक्त झालेल्या जागेवर सौ. रूपाली अवधूत पाटील यांची प्रभारी सरपंचपदी बिनविरोध निवङ झाली.
यावेळी शेळेवाङी गावचे नेते नानासो पाटील, माजी सरपंच रिना पाटील, ग्रामपंचायत सदस्य अक्षय पाटील, निलेश पाटील, एकनाथ कांबळे,  जयश्री पाटील, मंगल पाटील, निता कांबळे, सर्कल जनवाङे, तंटामूक्ती कमिटीचे अध्यक्ष संजय पाटील,  काँन्ट्रॅक्टर दिलिप पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते साताप्पा पाटील,  धनाजी पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते मधूकर पाटील,  अवधूत पाटील ग्रामविकास अधिकारी सूरेखा सूतार, ग्राम महसूल अधिकारी जे. एम. शिंदे""तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार माजी उपसरपंच निलेश पाटील यांनी मानले.
To Top