![]() |
देवराष्ट्रे : हॅलो प्रभात
महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिराचे महसूल विभागामार्फत आयोजन सुरू केले आहे. मात्र या अभियानात दाखल्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा दराने आकारणी करून सर्वसामान्यांची लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत तक्रार झाल्यानंतर लाभार्थ्यांचे पैसे परत दिल्याचे संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने शेतकरी,विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना दाखले, उताऱ्यासाठी त्रास कमी व्हावा या उद्देशाने महास्वराज्य अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केले आहे. या अभियानामध्ये रहिवासी दाखले, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, मतदार यादी नाव नोंदणी करणे व, रेशन कार्ड वाटप, संजय गांधी निराधार योजना, पी एम किसान योजना, श्रावणबाळ योजनेसह अन्य योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे.
तहसीलदारांनी आणि गांभीर्याने घ्यावे - राजेश गायगवाळे
महास्वराज्य अभियानांतर्गत काही गावात शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे . यातील काही गावांमध्ये दाखल्यासाठी ज्यादा पैसे घेऊन सुद्धा अद्याप दाखले देण्यात आले नाहीत. हा प्रकार अतिशय गंभीर असून तहसीलदारनी ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी मागणी वंचित चे राजेश गायगावळे यांनी केली.
![]() |
Join Our WhatsApp Group यामध्ये लाभार्थ्यांची कागदपत्रे घेऊन सेतू कार्यालयामार्फत दाखले देण्याचे नियोजन आहे. यासाठी शासनाने वेगवेगळ्या दाखल्यांसाठी वेगवेगळे शुल्क आकारणी केली आहे. असे असताना कडेगाव तालुक्यातील रामपूर येथे सोमवारी दाखल्यांसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा ज्यादा दराने पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर सदर प्रकार सेतू कार्यालयाशी संलग्न असल्याचे सांगत ज्यादा घेतलेले पैसे परत देण्यासंदर्भात संबंधितांना सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
|