![]() |
| डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील डॉ.तृषांत लोहार यांचे संशोधन लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित |
सांगली : हॅलो प्रभात
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.तृषांत रामचंद्र लोहार यांचे दोन संशोधन लेख Q2 श्रेणीतील, स्कोपस सूचीबद्ध आंतरराष्ट्रीय जर्नल ‘Research on Chemical Intermediates’ (Impact Factor 3.5) मध्ये प्रकाशित झाले आहेत. हे संशोधन रसायनशास्त्र क्षेत्रातील शाश्वत व पर्यावरणपूरक प्रक्रियांवर आधारित आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, मा.सदस्य सौ. स्वप्नाली कदम, तसेच प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे व उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले यांनी डॉ. लोहार यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन परंपरेला अधिक बळ मिळाले आहे.