रात्र महाविद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तावर राष्ट्रीय परिषद संपन्न

Admin

 

रात्र महाविद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तावर राष्ट्रीय परिषद संपन्न 


सांगली : हॅलो प्रभात
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सांगली यांच्या वतीने “Artificial Intelligence : Innovations, Opportunities and Challenges in Commerce, Management, Economics, Social Sciences, Law and Library Science” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटन सत्रास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्ही. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. शिवप्रसाद शेटे यांनी करून दिला. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दि. ब. अण्णासाहेब लठ्ठे यांचे प्रतिमापूजन करून वृक्षास जल अर्पण करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या बीज भाषणात प्रमुख पाहुणे गणेश भोसले, व्यावसायिक कॉर्पोरेट प्रशिक्षक यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोग, निर्णयक्षमतेमध्ये मानवी बुद्धिमत्तेची अपरिहार्यता व एआयसोबत मानवी कौशल्यांचे संतुलन या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  शांतिनाथ कांते यांनी आधुनिक शिक्षण व्यवस्थेत एआयचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.


यानंतर झालेल्या पहिल्या सत्रात डॉ. सुभाष कांबळे, सहयोगी प्राध्यापक, संगणक अभियांत्रिकी विभाग, एपीएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेंगळुरू यांनी एआयचा इतिहास, उत्क्रांती, मशीन लर्निंग, डीप लर्निंग व आधुनिक तांत्रिक पैलू यावर सखोल व्याख्यान दिले. अध्यक्ष म्हणून डॉ. शितलकुमार डी. पाटील उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात माननीय प्रा. डॉ. के. व्ही. मारुलकर, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी व्यवसाय, वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील एआयचे परिणाम, संधी आणि भविष्यातील आव्हाने यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय ठिगळे होते.
परिषदेच्या तांत्रिक सत्रामध्ये वाणिज्य, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रे, भाषा, कायदा व इतर विषयांतील एकूण १५३ संशोधन प्रबंधांचे सादरीकरण प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. सर्व संशोधन प्रबंधांचे डबल ब्लाइंड पीअर रिव्ह्यू पद्धतीने मूल्यमापन करून ऑनलाइन प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 
या परिषदेत ५० हून अधिक विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.
समारोप सत्रात प्रमुख पाहुणे डॉ. आर. एम. येल्लट्टी, प्रभारी प्राचार्य, वसंतराव दादा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत पाटील यांनी भूषविले. विविध तांत्रिक सत्र मध्ये प्रा. डॉ हर्षा चौगुले प्रा. दिपाली माने व प्रा. डॉ प्रिया टेळे यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गीता शेटे व  प्रशांत भंडारी व आभारप्रदर्शन विविध सत्रांमध्ये संबंधित प्राध्यापकांनी केले. परिषदेच्या संयोजन प्रा. एन डी.बनसोडे प्रा. पी. डी. पाटील यांनी संपूर्ण परिषद अत्यंत शिस्तबद्ध, ज्ञानवर्धक व संशोधनाभिमुख वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
To Top