![]() |
| 'रुबी हॉल' मधून महिलेचा मृतदेह गायब ! |
पुणे : हॅलो प्रभात
पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला असून ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह गायब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अकलूज येथील रहिवासी स्मिता भगत (वय ५५) यांना उपचारासाठी दि. १८ तारखेला पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच दि. १९ तारखेला सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले. मृत्यूनंतर नेहमीच्या प्रक्रियेनुसार मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, मृतदेह देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईकांचा दावा आहे, की बराच वेळ प्रतीक्षा करूनही मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला नाही. त्यानंतर अचानकपणे स्मिता भगत यांचा मृतदेह एका वेगळ्याच रुग्णवाहिकेतून त्यांच्या समोर बाहेरून आणण्यात आला. हा प्रकार पाहून नातेवाईक चांगलेच संतप्त झाले. मृतदेह नेमका कुठे होता, तो दुसऱ्या रुग्णवाहिकेतून का आणण्यात आला, याबाबत प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेसह मृत्यूनंतरच्या प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.