![]() |
| आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्येचा विजय साईतेजस्वी देशमुख जिल्हा परिषद सदस्य |
सांगली : हॅलो प्रभात
शिराळा मतदारसंघाचे भाजप आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती.
परदेशात शिक्षण घेतलेल्या साईतेजस्वी देशमुख यांच्या उमेदवारीकडे शिराळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. आमदार सत्यजित देशमुख यांनी कन्येच्या प्रचारासाठी विशेष लक्ष घातले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून साईतेजस्वी देशमुख विजयी झाल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून ही त्यांची पहिलीच निवडणूक होती. त्या कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
शिराळा मतदारसंघाचे भाजप आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती.
![]() |
| Join Now |
या निवडणुकीत भाजपचे स्थानिक नेते सम्राट महाडिक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही त्यांना पाठबळ दिले. साईतेजस्वी देशमुख या विधान परिषदेचे दीर्घकाळ सभापती राहिलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या नात असून, त्यांच्या विजयामुळे देशमुख कुटुंबाच्या राजकीय वारशात आणखी एक पाऊल पुढे पडल्याचे बोलले जात आहे.