जत येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

Admin

 जत  : डिजिटल हॅलो प्रभात (जॉकेश आदाटे)

    जत येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अतुल कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ व बहुजन सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय जिल्हाध्यक्ष संजयजी कांबळे व किरण शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. 

    यावेळी माजी उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, माजी नगरसेवक परशुराम मोरे, श्रीकांत सोनवणे, विक्रम ढोणे, महेश शिंदे, संतोष देवकर, किसन व्हनखंडे, दत्तात्रय शिंदे, बापू सूर्यवंशी, गणेश साळे, सुनील बागडे, सुनील क्यातन, अरुण साळे, सौ वनिताताई साळे आदीजन प्रमुख उपस्थित होते. तसेच परिसरातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.To Top