रिलायन्स जिओमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचे आयोजन

Admin

पुणे : डिजिटल हॅलो प्रभात 

जिओ महाराष्ट्राच्या वतीने  ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास  कर्मचाऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. 

    यावेळी सेफ्टी अवेअरनेस बाईक रॅली, पोस्टर स्पर्धा, क्विझ कॉम्पिटीशन, स्लोगन कॉम्पिटीशन, निबंध स्पर्धा याआरख्या  स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वाहनांची तपासणी, तसेच  कर्मचाऱ्यांना सुरक्षित ड्राईव्ह ट्रेनिंग या विषयांवर  जनजागृती तसेच मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त  फायर मॉक ड्रिल,  नैसर्गिक आपत्ती ड्रिल  करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन श्री. संदीप पाटील, स्टेट सेफ्टी हेड, महाराष्ट्र यांनी केले. यावेळी रिलायन्स जीओचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. To Top