करण काळेचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Admin

 



पिलीव : डिजिटल हॅलो प्रभात 

रयत शिक्षण संस्थेचे कै.रमेश खलीपे कनिष्ठ महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव येथील कु करण विनायक काळे याने राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून विद्यालयाची शान व गावची मान उंचावली व विद्यालयाच्या यशाची कमान उंचावून प्राचार्य एस.डी.कापसे त्याचप्रमाणे वर्गशिक्षक व सर्व शिक्षक शिक्षिकेतर स्टाफच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन यश संपादन केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, जि.प.मा. सदस्य गणेश पाटील, पिलीवचे सरपंच नितीन मोहिते, झिंजेवस्तीच्या सरपंच उमादेवी जावळे व स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्यांनी कु. करण काळे याचा यथोचित सन्मान केला व अभिनंदन केले. त्याच्या या यशाबद्दल पिलीव परिसरामध्ये सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.



To Top