नांदणी टोल नाक्याच्या अधिकार्‍यांकडून मागण्या मान्य

Admin
 प्रहार संघटनेचा रास्ता रोको आंदोलन स्थगित

मंद्रूप : डिजिटल हॅलो प्रभात ( समीर शेख) 

दक्षिण तालुक्यातील नांदणी टोल नाक्याच्या अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारा विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज शनिवार,दि.१८ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार होते.त्या पार्श्वभूमीवर प्रहारने कांही दिवसांपूर्वी यासंदर्भात नांदणी टोल नाक्याच्या अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता.तत्पूर्वी नांदणी टोल नाक्याच्या अधिकार्‍यांनी प्रहारने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याचे पत्र आज प्रहारच्या पदाधिकार्‍यांना दिले.मागण्या मान्य झाल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रहारच्या तालुका पदाधिकार्‍यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
   यावेळी प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुक्याध्यक्ष निरंजन ख्याडे,तालुकाउपाध्यक्ष समर्थ गुंड,कार्याध्यक्ष तायाप्पा कोळी,दक्षिण सोलापूर रुग्णसेवक रमेश कुंभार,संजय काळे,तालुका संपर्क प्रमुख अभिमान घंटे,कट्यप्पा काळे,श्रीदेवी कांबळे,योगेश कांबळे,ओगसिध्द व्हनकोरे,शिवलिंग कोळी,ईरप्पा काळे,शिवाजी मरिआईवाले,रमेश काळे,हणमंत तोडकरे,संतोष मदुरे,प्रमोद जाधव,शिरिष काळे,प्रशांत रगटे,केशव काळे,सुनील काळे,वकील बंडगर,लिंबाजी दुपारगुडे,रामलिंग कलुटगे यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रहार संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


To Top