जत येथे ट्रकसह ४८ लाखांची चोरी : एकास अटक

Admin

 जत
:डिजिटल हॅलो प्रभात

चालक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्याचा ट्रक मुद्देमालासह पळवून नेणाऱ्या रवींद्र गिरमल कांबळे (वय ३५, रा. बोलवाड, ता.मिरज) याला जत पोलिसांनी अटक केली.सोमवारी (दि. २७) रात्री पावणे आठ वाजता चालक महादेव गोविंद जमादार हे ट्रकमध्ये (एमएच १२ एसएक्स १६०३) २६ टन लोखंडी कॉईल घेऊन जत ते विजयपूर मार्गावर प्रवास करत होते. जतमध्ये महाराणा प्रताप चौकात एटीएममधून पैसे काढण्यासाठी ते उतरले. यावेळी ट्रक सुरूच ठेवला होता. ते एटीएममध्ये असताना अज्ञाताने ट्रक पळवून नेला. जमादार यांनी तातडीने जत पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. उपनिरीक्षक महेश गायकवाड, हेडकॉन्स्टेबल गणेश संकपाळ, विजयकुमार कोळेकर, संतोष कुंभार, प्रशांत खोत यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून ट्रकचा शोध घेतला. रवींद्र कांबळे याने ट्रक पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ट्रकसह ४७ लाख ८२ हजार ९१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. To Top