महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ओबीसी समाजाची जनगणना पूर्ण करु : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Admin

 

अहमदनगर : डिजिटल हॅलो प्रभात 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ओबीसी समाजाची जनगणना पूर्ण केली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी दिले. दरम्यान ओबीसी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले ओढून - ताणून आलेले शिंदे-फडणवीस सरकार राज्याच्या जनतेला अजिबात रुचलेले नाही . त्यामुळे जनतेच्या मनात माेठा राेष निर्माण झाला आहे . अशी टीका पाटील यांनी केली . अहमदनगर येथे आयोजित सावता परिषदचे 5 वे त्रेवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळाव्यात पाटील बोलत होते . आमदार संग्राम जगताप , आमदार प्राजक्त तनपुरे , सावता परिषदचे अध्यक्ष कल्याण आखाडे , प्रदेशाध्यक्ष मुयर वैद्य , उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राहुल जावळे , जिल्हाध्यक्ष निखिल शेलार , भगवान फुलसुंदर , शरद झोडगे आदी उपस्थित होते . To Top