कोथळी पुलास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव देण्यात यावे

Admin

 

जिल्हाधिकारांना मागणीचे निवेदन

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 

उपेक्षितांच्या अंतरंगाला साहित्यातून शतरंगी पैलू पाडून मराठी सारस्वतांमध्ये एक नवे दालन खुले करणारा शब्द उद्धार भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक धुड करणारा विश्वमित्र अवघ्या दोन दिवसांची शाळा शिकून स्वतःच्या लवचिक साहित्य तत्त्वज्ञानाचे विद्यापीठ निर्माण करणारे जगविख्यात तत्ववेत्ता, संयुक्त महाराष्ट्र  चळवळीमध्ये ज्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र क्रांतीची मशाल पेटविनारे,छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास परदेशात सांगणारे पहिले शिवशाहीर, हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन दिन,दलित, कष्टकरी, कामगारांचा तळहातावर तरलेली आहे असे विज्ञानवादी विचार जगासमोर मांडणारे,सुलतान कार,पौराणिक ऐतिहासिक काळापासून स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या सर्वांच्या मदतीला धावणार्या मातंग समाजाच्या अस्मितेचा पहिला हुंकार म्हणजे फकीराकार आणि अनुसूचित जाती मधील 59 जातीचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या मातंग समाजाचे प्रेरणास्थान महाराष्ट्र भूषण सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या हरिपूर-कोथळी पुलास देण्यात यावे अशी समस्त बहुजन विशेष करून मातंग समाजाची इच्छा आहे. 

हरिपूर-कोथळी पुलास साहित्यरत्न अण्णाभाऊ देणे म्हणजे समता व सामाजिक न्यायाची नवी ऐतिहासिक परिभाषा आहे.त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात त्यांच्या नावाचे पुल असणे म्हणजे त्यांच्या कार्य कर्तृत्वाची दखल घेतल्यासारखा आहे,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा गौरव सन्मान नियोजित हरिपूर- कोथळी या पुलाच्या रूपाने नांव देऊन व्हावा ही आग्रह हक्काची मागणी करीत आहोत.

असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी फुले,शाहू,आंबेडकर,साठे चळवळीतील अभ्यासू युवा नेते मा.आकाश तिवडे, दलित मित्र मा.अशोक पवार सर, लहुजी क्रांति मोर्चाचे मार्गदर्शन मा.सचिन आवळे,युवा नेते मा. गणेश वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते मा. अमर मगदूम, शिक्षकांचे नेते मा. आमोल माने, सामाजिक कार्यकर्ते मा. शिवाजी त्रिमुखे,सामाजिक कार्यकर्ते मा.लखन वारे, मा.तेजस मद्रासी,व कार्यकर्ते उपस्थित होते



To Top