श्री गोरक्षनाथ यात्रेनिमित्त शिराळ्यात कुस्ती मैदान

Admin

 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
 महायोगी श्री गुरु गोरक्षनाथ यांच्या यात्रेनिमित्त शिराळा येथे शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिराळा शहरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक व विराज नाईक यांनी दिली.शिराळा येथील यशवंत ग्लुकोज कारखाना संपर्क कार्यालय येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्ते व नागरिकांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, रविवार दि.१६ एप्रिल कामिनी एकादशी पासून ते शनिवार दि. २२ एप्रिल अक्षय तृतीयेपर्यंत गोरक्षनाथांची यात्रा भरते. दरम्यान शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी होणाऱ्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीसाठी गोरक्षनाथ केसरी किताब देण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असलेने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर उत्साह असतो. कोरोनामुळे मागील दोन - तीन वर्ष कुस्ती मैदान घेता आले नव्हते. यावेळी कुस्ती मैदानाचे आयोजन माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. मोठ्या कुस्त्यांसह परिसरातील पैलवानांच्या काटा लढती या कुस्ती मैदानात होणार आहेत. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक विजयराव नलवडे यांनी केले. बैठकीस माजी सरपंच प्रमोद नाईक, विश्वासचे संचालक विश्वास कदम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील कवठेकर, उत्तम निकम, अजय जाधव, बंडा डांगे, वैभव गायकवाड, नरेंद्र सुर्यवंशी, प्रताप दिलवाले, अमित गायकवाड, प्रताप यादव, दिपक गायकवाड, दिलीप कदम,  सचिन यादव, सुरेश नलवडे, हौसेराव गायकवाड, सागर नलवडे, प्रताप मुळीक, रमेश कांबळे, प्रवीण शेटे, जावेद काझी, हरिभाऊ कवठेकर, वासिम मोमीन, दिपक पिसाळ, विजय थोरबोले, अमित निकम, मोहन जिरंगे, वीरभद्र कानकात्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.To Top