गोरक्षनाथ यात्रा पक्षविरहित आहे, कोणीही राजकारण आणू नये : मठाधिपती पारसनाथ महाराज

Admin

 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात 
श्री महायोगी गोरक्षनाथ यात्रा पक्षविरहीत साजरी करण्यात येणार असून गोरक्षनाथ यात्रेमध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नये असे प्रतिपादन मठाधिपती पिर योगी पारसनाथजी महाराज यांनी केले.
मठाधिपती पिर योगी पासरनाथजी महाराज म्हणाले, गोरक्षनाथ महाराज हे सर्व धर्मियांचे जगतगुरु आहेत. शिराळा तालुक्यात या यात्रेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. परंतु कोरोणा महामारी मुळे काही वर्षं आपणं ही यात्रा सर्वसंपंन्न करू शकलो नाही. यावर्षीची गोरक्षनाथ यात्रा भव्य दिव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यात्रेला कोणीही  राजकीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न करु नये.प्रतिपादन गोरखनाथ मठाधिपती योगी पारसनाथ महाराज यांनी सांगितले. यावेळी रणजीतसिंह नाईक,संभाजी नलावडे, माजी नगरसेवक केदार नलावडे, सचिन नलावडे,संतोष गायकवाड, पै.अभिजीत शेणेकर, सचिन दिवटे, प्रतिक हसबनीस,‌सौरभ नलावडे,‌पै.अमित नलावडे,उपस्थित होते.To Top