अज्ञात रोगाने द्राक्षपिकच वाळले : बळीराजाचे १५ लाखाचे नुकसान

Admin

 

घाटनांद्रे डिजिटल हॅलो प्रभात 
तिसंगी (ता.कवठेमहांकाळ) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रमोद बसप्पा सावळे यांची चार एकर द्राक्षबाग ही अज्ञात रोगाने द्राक्षपिकासह वाळल्याने त्यांचे सुमारे १५ लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.  त्यामुळे त्यांच्यावर ही द्राक्ष बाग काढून टाकण्याची वेळ आली आहे. सततचा दुष्काळ गतसाली द्राक्षव्यापार्यांने १० लाखाला लावलेला चुना व आता हा अज्ञात रोगामुळे गेलेली संपूर्ण बाग. त्यामुळे ते पुरते कोलमडून गेले आहेत. 
याबाबत कृषी विभागामार्फत मिळालेली माहिती अशी की तिसंगी (ता.कवठेमहांकाळ) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रमोद बसप्पा सावळे यांची वाघोलीवडा पासून काही अंतरावर चार एकर द्राक्ष बाग आहे.चालू वर्षी बागेला द्राक्ष पिकही चांगले आले होते.या द्राक्ष पिकातून उत्पन्नही चांगले येईल अशी त्यांची अपेक्षा होती.दरम्यान गेले काही दिवसापासून अज्ञात रोगाने त्यांच्या बागेतील द्राक्ष पिकासह झाडेच वाळण्यास सुरुवात झाली.ही बाब द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रमोद सावळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्राथमिक उपचार म्हणून औषध फवारणीही केली,मात्र द्राक्ष पिकाच्या झाडावर कोणताही त्याचा परिणाम झाला नाही.त्यानंतर संपूर्ण बागेतील द्राक्ष झाडे द्राक्षपिकासह वाळून गेली.त्यानंतर त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली.कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी एम जे तोडकर,कृषी विज्ञान मंडळ कसबे डिग्रजचे डॉ महाजन,मंडळ कृषी अधिकारी विशाल पवार,कृषी पर्यवेक्षक डी एस पाटील,तिसंगीच्या कृषी सहाय्यका शितल शेळके,जी एस कोलगणे,गिरी,जगताप यांनी माती,मूळ,झाड,काड्या घड व पाने यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.


 
To Top