विद्यार्थ्यांनी घेतला ग्रामसभेचा अनुभव : प्रकाश पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचा सहभाग

Admin
इस्लामपूर : डिजिटल हॅलो प्रभात
        येथील प्रकाश पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी ग्रामसभेचा अनुभव घेतला. इयत्ता सहावीच्या नागरिकक्षात्र विषयांतर्गत विद्यार्थ्यांना ग्रामसभा म्हणजे काय ? ग्रामसभा का आयोजित केली जाते? याविषयीचे प्रात्यक्षिक प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये सादर केले गेले. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रामसभा या प्रात्यक्षिकासाठी लादेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ. रुपाली पाटील] डोंगरेवाडी गावच्या सरपंच सौ. सीमा पाटील , नागठाणे गावचे माजी सरपंच आप्पासो पाटील नागठाणे गावचे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंदे व महादेव पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्व पाहुण्यांसोबत ग्रामसभेबाबत प्रश्न चर्चा केली. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या ग्रामसभेविषयीच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरे दिली. तसेच एक सुजाण नागरिक म्हणून आपली कोणती कर्तव्ये आहेत आणि प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणती मदत केली पाहिजे याविषयीची चर्चा या ग्रामसभेत झाली.
        शाळेच्या प्रशासिका सौ.सुनिता निशिकांत भोसले –पाटील, प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.मधुकुमार नायर,उपप्राचार्या सौ.सिंधू नायर,पूर्व प्राथमिक विभगाच्या विभागप्रमुख सौ.वर्षाराणी पाटील,विषय शिक्षिका सौ.श्वेता कुलकर्णी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग कार्यक्रमास उपस्थित होता.
To Top