कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी अमोल येडगे यांची नियुक्ती

Admin
 कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी अमोल येडगे यांची नियुक्ती

कोल्हापूर : डिजिटल हॅलो प्रभात
राज्य शैक्षणिक संशोधक व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नियुक्ती येडगे यांच्या पदावर झाली. आज सायंकाळी ६ वाजता याबाबतचे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी काढले. 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कार्यकाळात अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा बनवला. तसेच याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. त्यांनी भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना रेशन कार्ड मिळवून दिले, अमेरिकन मिशनच्या जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न केले. मधाचे गाव पाटगाव ही संकल्पना राबवली. 

अमोल येडगे यांचा परिचय 
नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे हे मूळचे  हे कऱ्हाडचे असून २०१४ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. त्यांनी जळगाव येथे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. त्यानंतर हिंगोली आणि नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. नाशिक येथे त्यांच्याकडे आदिवासी प्रकल्पाधिकारी म्हणूनही कार्यभार होता. त्यांनी अमरावती आणि बिड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. २०२१ मध्ये ते यवतमाळचे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान प्रकल्पाचे संचालक म्हणनूही पदभार होता. सध्या ते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
To Top