बेकायदेशीर खोकेधारकांना मनपाचा दणका ; पहा व्हिडीओ...

Admin

बेकायदेशीर खोकेधारकांना मनपाचा दणका


सांगली :  डिजिटल हॅलो प्रभात

शहरात बेकायदेशीरपणे बसविलेली खोकी काढण्याची कारवाई 2 फेब्रुवारी पासून आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी स्वतः फिल्ड वर उतरून, उप आयुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सुरू केली आहे. वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी हठविलेली जात नव्हती.


पहिल्याच दिवशी सांगली-कोल्हापूर रोडवरील बेकायदेशीर बसविलेली ८ खोकी जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली. यापुढेही कारवाई जोमात करण्यात येणार असल्याचे उप आयुक्त वैभव साबळे यांनी सांगितले. २० पेक्ष्या जास्त रस्त्यावरील अतिक्रमण करणारे मोठे बोर्ड आणि फलक देखील काढून टाकले आहे. तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याच्या मोहीमेला सुरुवात केली आहे. 


जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापा पेक्ष्या जास्त आहेत ते देखील या पुढे कारवाईसाठी पात्र होणार आहे. सदरची कारवाई जोपर्यत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तो पर्यत चालू असणार आहे.

To Top