भाजपा आमदाराकडून गोळीबार ! ; धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वायरल...

Admin

50 गुंठे जमिनीचा वाद उफाळला
भाजपच्या गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार

कल्याण : डिजिटल हॅलो प्रभात

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराचा प्रकार झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली की, लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, यासंदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.


भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला आहे. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान तीन ते चार महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या एका ग्रुपमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांनी एकमेकांना विकास कामावरून आव्हान दिले होते. एकमेकांना विरुद्ध सोशल मीडियात टीका टिपणी केली होती त्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला.

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांनी सोशल मीडियामध्ये एकमेकांना चॅलेंज केले तुम्ही केलेली विकासकामे हे जनतेसमोर मांडा असे आव्हान एकमेकाना दिले गेले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ड’ वार्डमध्ये दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले. हा वाद एवढा चिघळला दोघांनी एकमेकांना आव्हान केल्यामुळे पोलिसांनी वेळीच महेश गायकवाड यांना त्यांच्या कार्यालयामधूनच ताब्यात घेतले आणि यांचा होणारा वाद पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टाळला.
Tags
To Top