शरद पवार गटाला मोठा धक्का ; राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला

Admin
शरद पवार गटाला मोठा धक्का 
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला धक्का दिला असून पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला स्वतंत्र गट वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल . निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार आहे. आता त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांचा व्हिप पाळावा लागेल.

निवडणूक आयोगाचे निर्णय
  • अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यामुळं त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता. 
  • महाराष्ट्रातले ४१, नागालँडमधले ७ आमदार अजित पवारांकडे लोकसभेचे २ खासदार अजित पवारांच्या बाजूनं
  • एका खासदारानं दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं
  • महाराष्ट्रातल्या ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं
  • राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटानं चिन्ह, पक्षाचं नाव सुचवावं. 
  • ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
  • राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गानं न झाल्याचा ठपका
Tags
To Top