मी कामाचा खासदार,नावाचा खासदार नाही : धैर्यशील माने

Admin
मतदारसंघासाठी ८२०० कोटींचा निधी दिला

पेठ : हॅलो प्रभात
मी कामाचा खासदार आहे, नावाचा खासदार नाही.मी रोज आलो आणि कामच केले नाही तर काय उपयोग? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारतचे स्वप्न आहे.त्यांना आपण साथ देऊया. खासदाराचे काय काम असते? खासदार काम करत नसता तर हातकणंगले मतदारसंघात ८२०० कोटींचा निधी दिसला असता का? टीका करणे सोपे असते पण,मी कृतीतून,माझ्या कामातून विरोधकांना उत्तर दिले आहे.पेठ – सांगली रस्त्यासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पुराच्या व्यवस्थापनेसाठी ३२०० कोटींचा निधी दिला आहे.माजी खासदारांचे गेल्या दहा वर्षातील काम बघा व माझी या दोन वर्षातील कामे बघा असा टोला महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी नाव न घेता माजी खासदार राजू शेट्टी यांना लगावला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पेठ (ता.वाळवा) येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडीक,लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजीतभाऊ देशमुख, शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राटबाबा महाडीक, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे,एम.एम.ग्रुपचे अध्यक्ष मोहनराव मदने,माजी सभापती जगन्नाथ माळी,वाळवा पश्चिम मंडलचे अध्यक्ष डॉ.सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.सम्राट महाडीक म्हणाले,ही निवडणूक गावकी-भावकीची नाही तर देशाची निवडणूक आहे. आणि देशहितासाठी देशाचे नेतृत्व करणाऱ्या मोदींना साथ करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून द्या. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रणजीत जाधव,वाळवा पश्चिम मंडल सरचिटणीस संग्राम गोईंगडे,शिराळा विधानसभा युवा मोर्चा निवडणूक प्रमुख राहुल पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष शुभम महाडीक,भास्कर चव्हाण, शकुंतला शेटे,वसुधा दाभोळे, उत्तम चांदणे,माजी उपसरपंच शंकर पाटील,चंद्रकांत पवार, अमीर ढगे,जवाहर ढगे,वनश्री पतसंस्थेचे चेअरमन राहुल पाटील,असिफ जकाते,विशाल शेटे,बजरंग भोसले,ग्रामपंचायत सदस्य निता भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
To Top