महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी ; 30 जणांचा मृत्यू तर... पहा अधिकृत आकडेवारी

Admin
घटनेच्या सुमारे २० तासांनंतर प्रशासनाने महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी  जाहीर केली. महाकुंभात झालेल्या या दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. तर एकूण ९० भाविक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वांवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. भाविक जमल्यानंतर त्रिवेणी संगमावर ही चेंगराचेंगरीची घटना घडली. कुंभमेळा प्रशासनाने ही माहिती दिली आहे. मंगळवार-बुधवारी रात्री दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली.
रात्री दीडच्या सुमारास आखाडा मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. प्रचंड गर्दीमुळे बॅरिकेड तुटले. त्यामुळे चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला आहे. बॅरिकेडिंग तोडून आत घुसलेल्या जमावाने आंघोळीसाठी थांबलेल्या लोकांना चिरडण्यास सुरुवात केली.
वैभव कृष्णन
कुंभनगरचे उपमहानिरीक्षक
To Top