![]() |
गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मोठी अपडेट ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर |
मुंबई : हॅलो प्रभात
कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सदर प्रकरणाचा तपास हा संथ गतीनं सुरु असून, या प्रकरणातील ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पानसरे यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठानं हा निर्णय दिला.