पुणे : हॅलो प्रभात
पुणे-नगर महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या मालवाहू ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक बीआरटी मार्गात घुसून पलटी झाल्याचा अपघात चंदननगर येथे सकाळी ११ च्या सुमारास घडला आहे. यामध्ये ट्रक चालक जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटक पासिंग असलेला मालवाहू ट्रक क्रमांक (केए_५९_बी_५५८८) हा कचरा भरलेला ट्रक घेऊन नगरच्या दिशेने जात असताना, टाटा गार्डन ते खराडी बायपास मारहापर्यंत बीआरटी मार्ग असून यादरम्यान कचऱ्याने भरलेला ट्रक हा चंदननगर येथे आला असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकवरिल चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक बीआरटीमध्ये घुसून पलटी झाला. अपघातात ट्रकचे पुढील व मागील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अपघातात ट्रकचालक जखमी झाला आहे.
![]() |
बीआरटीत पलटी झालेला ट्रक |
मुख्य मार्गावरच हा अपघात झाल्याने या मार्गावरील पुणे-नगर महामार्गावर दोन्ही दिशेने वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या.अनेकदा या मार्गावर बीआरटीचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना घडत असून यावर पालिका प्रशासन मात्र उपाय करण्याएवजी डोळेझाक करत आहे.या अपघातात ट्रकमधील कचरा रस्त्यावर सांडला होता.तर अपघातातील ट्रक उचलण्यासाठी चार जेसीबी बोलवण्यात आल्या होत्या.तीन ते साडेतीन तासाच्या आर्थिक प्रयत्नानंतर दोन जेसीबीच्या मदतीने हा ट्रक अपघात स्थळावरून हटविण्यात आला.