नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे महिला आरोग्य सर्वेक्षण

Admin
नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे महिला आरोग्य सर्वेक्षण
सांगली : हॅलो प्रभात 
येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या शारीरिक शिक्षण विभागामार्फत शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण या विषयावर १०० महिलांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित केली.  त्यात प्रामुख्याने महिलांचे विविध आजार,मासिक पाळीत होणारा त्रास, आरोग्य विमा, मानसिक आरोग्य, झोप, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि प्रसाधन गृहाच्या सुविधा, जुने आजार , कौटुंबिक आर्थिक स्थिती या विषया वरील प्रश्नांचा समावेश होता.पूर्वनियोजित प्रश्नावली भरून घेऊन विद्यार्थ्यानी माहिती संकलित केली. यासाठी सहाय्यक प्रा. डॉ.प्रिया टेळे यांनी विद्यार्थ्याचे नेतृत्व करून त्यांना मार्गदर्शन केले. या माहितीचे वर्गीकरण आणि विश्लेषण करून झोपडपट्टीतील महिलांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी शिफारशी केल्या जाणार असल्याचे डॉ. प्रिया टेळे यांनी सांगितले.


शारीरिक शिक्षण विषयाच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यानी हा सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेतला होता. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्राचार्य डॉ. बी. व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विभागातील विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक क्षेत्रीय अभ्यासाला असलेले महत्त्व विचारात घेता, या अभ्यास सर्वेक्षणाला विशेष असे महत्त्व प्राप्त होते तसेच नॅकच्या अपेक्षेनुसार विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि भान निर्माण करण्याच्या दृष्टीने या महिला आरोग्य सर्वेक्षणाला खास असे महत्त्व असलेने विभागांतर्गत हा क्षेत्रीय उपक्रम हाती घेतला होता.  या सर्वेक्षणाला मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉ.पाटील यांनी डॉ. प्रिया टेळे यांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
Tags
To Top