मोठी कारवाई..! नशेची औषधे विकणारे ताब्यात ; सव्वासहा लाखांची प्रतिबंधित औषधे जप्त

Admin
 नशेची औषधे विकणारे ताब्यात 
तब्बल सव्वासहा लाखांची प्रतिबंधित औषधे जप्त 

सांगली : हॅलो प्रभात
मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या महत्वाच्या कारवाईत तब्बल सव्वासहा लाखांची प्रतिबंधित औषधे जप्त केली. त्यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून पै. रोहित कागवाडे (वय ४४, रा. शामरावनगर), ओंकार मुळे (वय २४,रा. गव्हर्मेंट कॉलनी), आणि आशपाक पटवेगार (वय ५०, रा.पत्रकारनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी रोहित हा मेडिकल चालक असून त्याच्या नावे औषधविक्रीचा परवाना असल्याचे घुगे यांनी सांगितले. ही कारवाई सोमवारी दि. २० रोजी करण्यात आली. या पत्रकार बैठकीस अपर अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहायक निरिक्षक संदीप शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरिक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.

गुन्ह्याची अधिक माहीत अशी, काही संशयित नशेसाठी औषधांची विक्री करत असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सापळा लावण्यात आला होता. उद्यानाच्या मागील बाजूस दोघे संशयित येऊन थांबले. त्यांनी पिशवीतील साहित्याची देवाणघेवाण केली. त्याचवेळी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. रोहितकडील पिशवीत मेफेनटर्माइन इंजेक्शनच्या २८ कुप्या व ओंकारकडील पिशवीत २३ कुप्या सापडल्या. दरम्यान औषध निरिक्षक राहुल कारंडे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. रोहित व ओंकार यांनी ही औषधे सांगलीतील आशपाक पटवेगार याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. अशपाक याच्याकडे असलेल्या औषध साठयाबाबत विचारणा केली असता त्याने कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. त्यानंतर नमुद पथकाने आशपाक यांचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता अशपाक यांचे राहते घरामध्ये दुसऱ्या मजल्यावरील उत्तराभिमुखी हॉलमध्ये लहान मोठे बॉक्स मिळुन आले. सदरचे बॉक्स उघडुन पाहता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीची नशेकामी वापरण्यात येणारे इंजेक्शन व टॅबलेट मिळुन आले आहेत.
 

सदर औषधे अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी तपासणी करुन सांगितले की, सदरची सर्व इंजेक्शन हे मानवी जिवितास अपायकारक असुन ती मान्यताप्राप्त डॉक्टरांचे चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास व वापरण्यास बंदी असल्याचे सांगीतल्याने सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यरात आलेला आहे. अशपाक याचे राहते घरामध्ये विविध कंपनीच्या एकुण १३६० नशेच्या इंजेक्शन बॉटल, १७६ विवीध गोळयांचे पाकिटे मिळुन आले आहेत. नमुद पथकाने तेथे उभ्या आसलेल्या चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये देखील ९६ नशेच्या इंजेक्शन बॉटल मिळुन आल्या आहेत. या नंतेर पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता १२३, २७८, ३(५) या कलमांसह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधने अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
Tags
To Top