ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

Admin
ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

दिघंची : हॅलो प्रभात
येथील नळमळा भागात  ट्रॅक्टरने धडक दिल्याने पार्वती दत्तू जाधव (वय 80, रा. नंदेश्वर भोसे)  या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला.  धडक इतक्या जोरची  असल्याचे महिलेच्या डोक्यास गंभीर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी नळमळा येथे घडली. याबाबत ट्रॅक्टर चालक समाधान दादासो पवार याचेविरुद्ध मृत वृद्धेचा  नातू नितीन यशवंत मोरे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अधिक माहीत अशी,
पार्वती जाधव या रानमळा ते नळमळा या डांबरी रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. यावेळी समाधान हा विना नंबरचा ट्रॅक्टर, तसेच  दोन ट्रॉल्या घेऊन निघाला होता. या ट्रॅक्टरने पार्वती यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस जाधव करीत आहेत.

Tags
To Top