![]() |
| लोणी काळभोर गटात भाजपचे तीन उमेदवार जाहीर |
लोणी काळभोर : हॅलो प्रभात
लोणी काळभोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांसाठी भारतीय जनता पक्षाने पूनम गायकवाड यांच्यासह तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक लढत आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी शीतल कांबळे, लोणी काळभोर पंचायत समिती गणातून रेश्मा काळभोर, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून अमोल टेकाळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने प्रचाराला वेग आला असून राजकीय वातावरण तापू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर परिसरात खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे प्रचाराच्या काळात भारतीय जनता पक्षात अनेक दिग्गज व मातब्बर मंडळींचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

